जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना आणि याच योजने करता 2024-25 या वर्षा करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती करता राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना ज्या योजनेच्या अंतर्गत विविध बाबींचा लाभ हा या लाभार्थ्यांना दिला जातो मित्रांनो राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये भटक्या जमाती क प्रवर्गातील 18 ते 60 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी ही योजना
राबवली जात आहे आणि याच योजने करता अर्ज मागवण्यासाठी 12 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024 ही मुदत देण्यात आलेली आहे अर्थात या योजनांचे अर्ज 26 सप्टेंबर 2024 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत याच्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालन याच्यामध्ये पायाभूत सुविधा सह 20 मेंढ्या आणि एक मेंढा नर अशा 20 मेंढी गटाचं 75% अनुदानावरती वाटप केलं जातं ज्याच्यामध्ये लाभार्थ्याला साधारणपणे अडीच लाख रुपया पर्यंत अनुदान दिलं जातं या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे ऑलरेडी शेळ्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना पुढील प्रमाणे लाभ दिला जातो ज्याच्यामध्ये सुधारित प्रजातीच्या नरमेंढ्याच 75% अनुदानावरती वाटप मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान
मेंढील पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान याचप्रमाणे हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरता घासण्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी 50% अनुदान पशुखाद्य उभारण्यासाठी 50% अनुदान अशा विविध बाबी देखील लाभवल्या जातात याचप्रमाणे मेंढ्यासाठी चराई अनुदान ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान 20 मेंढ्या आणि एक मेंढा नर एवढं पशुधन आहे अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह ₹6000 असं एकूण ₹24000 चराई अनुदान वाटप केलं जातं जात याचप्रमाणे कुकुट पक्षाच्या खरेदी आणि संगोपनासाठी अनुदान याच्यामध्ये चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या 100 कुकुट पक्षाच्या खरेदी आणि संगोपनासाठी ₹9000 रुपयांच्या मर्यादेमध्ये 75% अनुदान दिलं जातं याचप्रमाणे ज्या भूमीन मेंढपाळाकडे
शेळी मेंढी आहेत अशा मेंढपाळांना जागा खरेदीसाठी सुद्धा या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं याच्यामध्ये बंदिस्त मेंढी शेळीपालना करता जागा खरेदी करण्याकरता जागा खरेदीच्या 75% अथवा किमान 30 वर्षासाठी भाडे करारावरती जागा घेण्यासाठी भाड्यापोटी देवायाच्या रकमेच्या 75% रक्कम किंवा एक वेळची एक रकमे अर्थसाहाय्य म्हणून ₹50000 एवढं अनुदान दिलं जातं आणि मित्रांनो याच योजने करता 12 सप्टेंबर 2024 पासून अर्ज स्वीकारण्यासाठी सुरू झालेले आहेत याच्यासाठी तुम्ही wwwmahameshorg या संकेत स्थळावरती अर्ज करू शकता अर्ज करणारा लाभार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील असावा आणि वय 18 ते 60 वयोगटातील असावं मित्रांनो या योजनेचा अर्ज कसा करावा याच्या अटी शर्ती पात्रतेचे निकष
काय आहेत कागदपत्र काय लागतात कागदपत्र कशी अपलोड करावी लागतात लाभार्थ्याला याला पुढील लाभ कसे दिले जातात या सर्वांबद्दल आपण वेळोवेळी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे ते व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता आणि याच्या संदर्भातील नवीन अर्ज कसा करावा याच्या संदर्भातील इतर काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा त्याच्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करू भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद