जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या भावांतर योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाचा अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे याच्यासाठी राज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन भावांतर योजना राबवली जात आहे मित्रांनो याच योजने करता पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून 4194 कोटी 68 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती परंतु मित्रांनो या योजनेचा निधी वितरित करत असताना वित्त विभागाच्या मंजुरीनुसार 60% च्या प्रमाणामध्ये या निधीचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्यासाठी 29 जुलै 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून
60% च्या मर्यादेमध्ये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्याच अंतर्गत 2516 कोटी 80 लाख रुपयांचा निधी यापूर्वीच वितरित करण्यात आलेला होता परंतु हा निधी वितरित करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं होतं तर शेतकऱ्यांना दिलं जाणार अनुदान हे पूर्ण न वितरित करता फक्त 60% प्रमाणामध्ये दिलं जाणार आहे अशा प्रकारच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आलेल्या होत्या आणि आता याच चर्चांना अफवांना पूर्णपणे विराम मिळणार आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून या योजने करता मंजूर करण्यात आलेला पूर्णच्या पूर्ण निधी आजच्या जीआरच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यापूर्वी वितरित करण्यात आलेला 2516 कोटी
80 लाख रुपयांचा निधी याच बरोबर या योजनेसाठी उर्वरित असलेला 1593 कोटी 99 लाख रुपयांचा निधी हा आजच्या जीआरच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत या योजनेसाठी वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला 4194 कोटी 68 लाख रुपयांचा निधी आता पूर्णपणे वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची नाव वगळण्यात आलेली होती त्या शेतकऱ्यांना देखील समावेश करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्यांची देखील आता याच्यामध्ये समावेश करण्याची तयारी सुरू आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत आता हा निधी पूर्णपणे
वितरित झाल्यामुळे जे शेतकरी आता याच्यामध्ये पात्र होतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो एकंदरीत ज्या पद्धतीने याची आता तयारी सुरू आहे या अनुषंगाने साधारणपणे 16 सप्टेंबर नंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती देण्यात येत आहे याचा काही कार्यक्रम नियोजित केला जाईल आणि याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद