जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषिमंत्री याचबरोबर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो विविध जिल्ह्यांमध्ये आपण पाहिलेले की या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती ग्राम स्तरावरती त्या त्या भागामध्ये समित्या नेमून त्यांच्या माध्यमातून हे पंचनामे पार पाडण्यात येत आहेत मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली असेल जालना असेल नांदेड असेल परभणीचा काही भाग असेल लातूर असेल धाराशिवचा काही भाग असेल या भागांमध्ये
मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून आलेले आहे याच बरोबर इतरही जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये नुकसान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करून ते पंचनामे मोठ्या प्रमाणात पार पाडले जात आहेत आणि आता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषाच्या बाहेर जाऊन म्हणजे 8500 रुपये प्रति हेक्टर जी दिली जाणारी नुकसान नुकसान भरपाई आहे याच्या ऐवजी 13600 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्याच बद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति शेतकरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये 13600 रुपये प्रति हेक्टर अशा प्रमाणामध्ये नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो याच्यासाठी आता तलाठी
कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या समितीच्या माध्यमातून संयुक्तिक सर्वे पार पाडले जात आहेत हे सर्वे झाल्यानंतर डाटा तहसील जमा केला जाईल तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढे विभागीय आयुक्तांना आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य सरकारला या नुकसानीच्या पंचनाम्याचा जो काही रिपोर्ट आहे शेतकऱ्यांची झालेली नुकसानाची माहिती याच बरोबर लागणारा निधी या सर्वांचा एक प्रस्ताव पाठवला जाईल आणि याच विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावाच्या माध्यमातून पुढे शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून मदतीचं वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो अशाप्रकारे या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भात ही काही एक महत्त्वाची अशी पावलं उचलली जाते करत आहे ज्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न
केलेला आहे धन्यवाद