जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अखेर 2024 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी पाऊस गारपीट अतिवृष्टी अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी पहिल्या टप्प्याचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील महत्त्वाचे असे चार जीआर आज 20 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत मित्रांनो याच जीआरच्या माध्यमातून कोणत्या महिन्यातील कोणत्या नैसर्गिक आपत्तीसाठी कोणत्या जिल्ह्याला किती मदत दिली जाणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये पहिला जो टप्पा असणार आहे पहिली जी मदत असणार आहे ती म्हणजे जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या भरपाईच्या संदर्भातील मित्रांनो जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये
गोंदिया पुणे लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यशासन माध्यमातून 23 कोटी 72 लाख 99 हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकूण 8685 शेतकऱ्यांना 8 कोटी एक लाख रुपयाचा निधी वितरित केला जाणार आहे पुणे जिल्ह्यातील 4048 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 15 लाख 20000 रुपये तर लातूर जिल्ह्यातील एकूण 5011 शेतकऱ्यांसाठी 3 कोटी 53 लाख हजार रुपये नाशिक जिल्ह्यातील 15 धुळे जिल्ह्यातील
395 नंदुरबार जिल्ह्यातील 155 जळगाव जिल्ह्यातील 3118 याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील 53 असे एकूण नाशिक विभागातील 3736 शेतकऱ्यांना 6 कोटी 85 लाख दहा हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर विभागीय आयुक्त नाशिक यांच्या माध्यमातून 24 ऑगस्ट 2024 च्या प्रस्तावानुसार अहमदनगर जिल्ह्यातील 263 शेतकऱ्यांसाठी ₹640000 निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो याच बरोबर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यातील मिळून कोकणातील एकूण 13715 शेतकऱ्यांसाठी तीन कोटी 11 लाख 57 हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत जून ते ऑगस्ट या कालावधीमधील पहिल्या टप्प्यामधील पहिल्या प्रस्तावानुसार 35458 शेतकऱ्यांना 23 कोटी 72 लाख 93 हजार रुपयांची नुकसान भरपाई
देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच बरोबर मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये विविध भागांमध्ये गारपीट झालेली होती अवेळी पाऊस झालेला होता आणि या झालेल्या नुकसानीसाठी 44 कोटी 74 लाख 25 हजार रुपये एवढी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये नागपूर विभागातील चंद्रपूर मार्च 2024 आणि मे 2024 असे दोन प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते आणि या दोन्ही प्रस्तावाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील 2026 शेतकऱ्यांना दोन कोटी 71 लाख 34 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे पुणे जिल्ह्यासाठी मे 2024 सातारा जिल्ह्यातील एप्रिल मे सोलापूर जिल्ह्यामधील मे 2024 तर सांगलीमध्ये एप्रिल 2024 मध्ये
झालेल्या नुकसान भरपाईसाठी एकूण पुणे विभागातील 18000 177 शेतकऱ्यांना 41 कोटी 50 लाख 80 हजार रुपयाचे नुकसान भरपाई दिली जाणार आहे ज्याच्यामध्ये मे 2024 मध्ये सोलापूर झालेल्या गारपिटीसाठी अतिवृष्टीसाठी 15451 शेतकऱ्यांना 37 कोटी 40 लाख रुपयांचे नुकसान भरपाई दिली जाणार आहे याचप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये मे 2024 मध्ये झालेल्या अवेळी पावसासाठी 441 बाधित शेतकऱ्यांना 52 लाख 111 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि एकंदरीत या कालावधीमध्ये गारपीट आणि अवेळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातील 20600 44 शेतकऱ्यांना 44 कोटी 74 लाख 25 हजार रुपयाचे नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो याच बरोबर फेब्रुवारी 2024 मध्ये यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी
पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती बुलढाणा आणि यवतमाळ साठी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील 11373 शेतकऱ्यांना 1706000 तर बुलढाणा जिल्ह्यातील 57240 शेतकऱ्यांना 5 कोटी 507000 नुकसान भरपाई देण्यासाठी आज मंजुरी देण्यात आलेली आहे याचप्रमाणे ऑक्टोबर 2023 मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकेच्या नुकसानीसाठी काही शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये सांगली शिराळा तालुक्यातील 18 शेतकऱ्यांना 18445 ची नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाप्रकारे हे चार महत्त्वाचे असे जीआर निर्गमित करून आज राज्य शासनाच्या माध्यमातून या पहिल्या टप्प्याच्या नुकसान भरपाईचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात
आलेली आहे मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य बहुतांश सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यातील लाखो शेतकरी या नुकसान भरपाईसाठी पात्र होण्याची शक्यता आहे साधारणपणे 20 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा आकडा हा येऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवरती सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि याच्यानंतर पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सेपरेट प्रस्ताव सादर करून त्याच्या संदर्भातील जीआर निर्गमित केला जाईल आणि त्याच्या संदर्भातील देखील जे जे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद