नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 26 सप्टेंबर पर्यंत जमा करण्यात येणार आहे या अनुदानाचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे मुंडे यांनी शुक्रवारी म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली या बैठकीत मुंडे यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या त्यानंतर मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत या अनुदान वाटपाबद्दल बद्दल पत्रकारांना माहिती दिली आता या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या 26 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या
शुभहस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हेक्टर पर्यंतची वाटप हे 26 तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की 26 तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचा सुद्धा ई केवायसी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नुसार पंतप्रधानांचा दौरा एक दोन दिवस मागे पुढे सुद्धा होऊ शकतो त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या ई केवायसी ची प्रक्रिया पुढच्या चार-पाच दिवसात
करण्याचे निर्देशही कृषिमंत्री मुंडे यांनी दिली आहेत पहिल्या टप्प्यात 46 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या अनुदानाची प्रतीक्षा त्यामुळे अखेर संपण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत पण मग पात्र शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती आहे कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान लवकरच मिळू शकतं कुणाचं रखडलं जाऊ शकतं आणि त्याची कारणं नेमकी काय आहेत तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओतनं आपण समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर 2023 च्या खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान दिलं जाणार आहे त्यासाठी 4194 कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारकडून मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे
राज्यात सोयाबीन कापूस खातेदारांची संख्या किती आहे तर 961000 आतापर्यंत यापैकी 75 लाख 31000 शेतकऱ्यांकडून संमतीपत्र असतील आणि नाहरकत प्रमाणपत्र असतील कृषी विभागाला देण्यात आली आहेत त्यापैकी महाआयटीने तयार केलेल्या पोर्टलवर 64 लाख 87 हजार शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाकडून भरण्यात आलेली आहे नमो शेतकरी सन्मान निधीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पोर्टलवर माहिती पडताळून घेण्यात आली आहे त्यापैकी नमो शेतकरी सन्मान निधीला पात्र असलेल्या शेतकऱ्यांची म्हणजेच 46 लाख हजार शेतकऱ्यांची माहिती पडताळणी केल्यानंतर या डेटाशी जुळली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचं पहिल्या टप्प्यात अनुदान जमा होण्याची शक्यता अधिक दिसते तर दुसरीकडे ई पीक पाहणी केलेल्या 36 लाख शेतकऱ्यांची नावही माहिती पडताळणी केल्यानंतर जुळाली
आहेत पण अजूनही दहा लाख शेतकऱ्यांच्या नावांची पडताळणी बाकी आहे त्यामुळे त्यांची पडताळणी करून ती नाव जुळल्यानंतरच त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा करण्यात येणार आहे म्हणजेच काय तर या दहा लाख शेतकऱ्यांना ई केवायसी करावी लागणार आहे आता त्याबद्दल एक शक्यता म्हणजे या शेतकऱ्यांकडून महाआईटीनं तयार केलेल्या पोर्टल वरून ई केवायसी करण्यात येईल अर्थात ती कधी करण्यात येईल याबद्दलही स्पष्ट काही सांगण्यात आलेलं नाही आहे तर ज्या शेतकऱ्यांची ईपीक पाहणी झालेली नाहीये त्यांचं काय होणार याबद्दलही राज्य सरकारनं अजून काही स्पष्ट सांगितलं नाही यापूर्वीचा अनुभव बघता मोदींच्या दौऱ्या दिवशी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल अशी शक्यता अधिक आहे कृषिमंत्री मुंडे
यांनी सांगितलं त्याप्रमाणे मग भलेही मोदींचा दौरा एक दोन दिवस मागे पुढे झाला तर त्यानुसारच अनुदान वाटप करण्यात येईल कारण राज्य सरकारला त्याचा इव्हेंट मोठ्या धूम धडाक्यात साजरा करायचा असं दिसतंय यापूर्वी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता दोन महिने रखडून ठेवण्यात आला होता शेवटी परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचा दौरा निश्चित झाला आणि पुढच्या एका दिवसात चौथ्या हप्त्याला मंजुरी सुद्धा राज्य सरकारकडून देण्यात आली दुसऱ्या दिवशी तर केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते या निधीचं वाटप सुद्धा शेतकऱ्यांना करण्यात आलं राज्य सरकारने इव्हेंट केला पण त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली तर काही शेतकऱ्यांच्या
खात्यावर दोन हप्त्याची रक्कम एकदाच जमा करण्यात आली आणि नंतर ती परत सुद्धा घेण्यात आली बहुतांश शेतकऱ्यांचा हप्ता तर चार-पाच दिवस पेंडिंग मध्ये राहिला म्हणजे इव्हेंटचा शेवटी शेतकऱ्यांना जाच सहन करावा लागला आताही मागच्या अडीच महिन्यापासून सोयाबीन कापूस अनुदानाच्या वाटपाची तारीख वर तारीख ठरवली जाते पण मुहूर्त काही पाळला जात नाही कारण राज्य सरकारला इव्हेंट करण्यात अधिक स्वारस्य दिसतंय पण या या सगळ्या गडबडीत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही अशी एक चिंता जाणकार व्यक्त करतायत अर्थात 26 तारखेला वाटप तरी सुरू होईल का की पुन्हा एकदा नवीन तारीख कृषिमंत्र्यांकडून देण्यात येईल याकडेही
आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे या माहिती सोबत या विश्लेषणासोबत मी तुरतास इथेच थांबतोय तुम्हाला काय वाटतंय 26 तारखेपर्यंत अनुदान जमा होईल का हो वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये हो म्हणून नक्की कमेंट करा नाही वाटत असेल तर नाही म्हणून कमेंट करा करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या youtube चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ऍग्रोवनच्या youtube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या [संगीत] اللہ