जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील नवीन घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या याच बरोबर घरकुलाची मंजुरी मिळून पहिल्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो आज 24 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मोदी आवास घरकुल योजनेच्या निधी वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे याच बरोबर राज्यामध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी राबवल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत सातारा अमरावती गडचिरोली चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यामधील नवीन घरकुलाला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असे जीआर आज 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्यामधील सर्वात पहिला महत्त्वाचा जो
जीआर आहे तो म्हणजे मोदी आवास घरकुल योजनेच्या संदर्भातील बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांची घरकुल मंजूर झालेली आहेत पहिल्या हप्त्याचं वितरण झालेले आहे काही लाभार्थ्यांना दोन हप्ते मिळालेले आहेत आणि अशा लाभार्थ्यांना पुढचे जे हप्ते वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आज 750 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वीच या योजनेसाठी 1300 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला होता ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं आणि आजच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून या योजनेसाठी 750 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजने अंतर्गत नवीन पात्र
असलेल्या 3950 लाभार्थ्यांच्या घरकुल यादीला आज मंजुरी देखील देण्यात आलेली आहे त्याच्यासाठीचा निधी देखील उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली याच्यामधील पहिली मंजुरी आहे ती म्हणजे सातारा जिल्ह्याची सातारा जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुलाच्या या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये 31 लाभार्थ्यांची घरकुल सातारा जिल्ह्यामधून मंजूर करण्यात आलेली आहेत याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामधील एकूण 1232 लाभार्थ्यांच्या या घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला याचप्रमाणे त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या निधीला आज राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामधील 1721 लाभार्थ्यांना देखील आजच्या या जीआरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी आवश्यक असणारा 23 कोटी रुपयांचा निधी देखील चंद्रपूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला
आहे ज्याच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 1721 नवीन पात्र लाभार्थ्यांना या घरकुलाचा लाभ मिळणार आहे याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील 440 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना देखील या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहे याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील 526 घरकुल लाभार्थ्यांना देखील आजच्या या जीआरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे अशाप्रकारे वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती आणि सातारा या पाच जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत पात्र झालेल्या या लाभार्थ्यांना 3950 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे आणि याच्यासाठी आवश्यक असलेला निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे या पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी सुद्धा जीआर सोबत प्रकाशित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो राज्यामध्ये घरकुलासाठी राबवल्या
जाणाऱ्या या महत्त्वाच्या अशा योजना आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद