देवाच्या प्रिय लोकांना आज रात्री पुन्हा एकवार प्रभूच्या पवित्र चरणाशी आपण एकवटलेलो आहोत. आमचा संपर्क निरंतर परमेश्वराशी जुडलेला पाहिजे कंटिन्यू एकही दिवस एकही क्षण आमच्या आयुष्यात असा नसावा की त्या समयात किंवा त्या क्षणामध्ये आम्ही परमेश्वरापासून दूर गेलेलो आहोत सतत आम्हाला निरंतर येशूच्या संपर्कात राहायचे जेव्हा एखादं विमान आकाशात उड्डान घेत त्या विमानाचा संपर्क कंट्रोल रूमशी सतत व्हायला पाहिजे आणि जर तो संपर्क जर तुटला तर ते थोडं धोकादायक असतं आणि अशाच गोष्टींमुळे बऱ्याचदा काही विमान गायब झाली ती आजपर्यंत सापडली नाही कंट्रोल रूमशी विमानाचा संपर्क पाहिजे तस आमच कंट्रोल रूम हेडक्वार्टर वरती आमचा नेहमी संपर्क स्वर्गाशी जोडलेला पाहिजे आम्ही निरंतर प्रभूशी कनेक्टेड पाहिजे आणि त्या संपर्कामुळेच आमचं जीवन आशीर्वादित होणार आहे जेव्हा तो संपर्क तुटतो त्यावेळेस माणसाच्या जीवनात आडी अडचणी येतात कुठल्याही व्यक्तीचा चा नाश होण्यापूर्वी त्याच्या थोडस आधी जाऊन बघितलं तर तो देवापासून दूर गेलेला असतो असं कधीच होत नाही की एक व्यक्ती खूप प्रभूच्या सानिध्यात आहे प्रभूच्या सामर्थ्यात आहे प्रभूच्या कृपेत आहे परंतु तरी सुद्धा त्याच्या जीवनात असं कसं काय घडलं असं कधी होत नाही प्रियांनो निरंतर त्या प्रतापी परमेश्वराच्या संपर्कात आम्ही टिकून राहिलं पाहिजे त्याच्याशी आम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे ते आमच्यासाठी अत्यंत आशीर्वादाच आहे आमचा जो मेंदू आहे त्याच्यात खूप कनेक्शन जास्त थोडे थिडके नाही संख्या ऐकून तुम्हाला थोडस शॉकिंग असल द लाख कोटी सिनेप्टिक कनेक्शन्स ब्रेनमध्ये असतात प्रत्येकाच्या दहा लाख कोटी देव बापानी खूप विचारपूर्वक आपल्याला बनवलेल आहे हालेलुया आण त्याच्यातल एक जरी कनेक्शन इकडे तिकडे गेलं की मग सगळी गडबड होऊन जाते शॉर्ट सर्किट देवाच्या संपर्कात राहिल्याने अद्भुत गोष्टी घडतात अरुणाची काठी अरुणाच्या हातात आहे तोपर्यंत मेलेली आहे देवाच्या उपस्थितीत आली जिवंत झाली प्रियांनो हालेलुया प्रभूच्या संपर्कात आल्याने गोष्टींच महत्व बदलत चिन्ह चमत्कार अद्भुत गोष्टी होतात त्याच्या कनेक्शन मध्ये येऊन बघा दूर उभे राहणारे नाव ठेवू शकतात बोलू शकतात पण एकदा ती काठी देवाच्या उपस्थितीत आली मेलेली काठी जिवंत झाली पालवी फुटली फुल आली बदाम आले अद्भुत गोष्ट घडली पाच भाकरी दोन मासळी लहान मुलाच्या हातात आहे तोपर्यंत त्याचा एकट्याचा टिफिन आहे येशूच्या हातात एकदा पोहोचल बस पाच हजारांसाठी तो एक आशीर्वाद आहे प्रियांनो येशूच्या संपर्कात येणाऱ्या गोष्टी अत्यंत आशीर्वादित होऊन जातात शिखल एक दिवशी हातात घेतलं काय किंमत नाही त्या मातीला पण हात प्रभूचे लागले ना आंधळ्याला दृष्टी मिळाली प्रियांनो हालेलुया ऑर्डिनरी गोष्टींना एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवण्याच सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे आणि जे त्याच्या संपर्कात जातील ते आशीर्वाद योहान दहावा अध्याय 27 आणि 28 वचनामध्ये माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात सगळ्यांनी म्हणा माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात प्रभूच्या मेंडरांनो तुम्ही प्रभूची वाणी ऐकत आहात का प्रभूला धन्यवाद मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही पित्याने आम्हाला येशूच्या हातात दिलेला आहे आणि येशूच्या हातातून आम्हाला कोणी काढूनच घेऊ शकत नाही हे प्रभूच पवित्र वचन आहे किती लोक आमीन म्हणतील तो साथ सोडत नाही प्रभू कधीच साथ सोडत नाही किती लोक आमीन म्हणणार आहेत म्हणा प्रभू साथ सोडत नाही मग साथ सोडणारे कोण आपण आहेत प्रभू नाही साथ सोडत प्रभू कधीच सोडत नाही आलिशाच्या हाडांना दुर्गंधी आली प्रभूने नाही सोडलं मुर्दे उठवायचं काम त्या हस्तीमधून मेलेल्या हाडांमधून केलं देव सोडत नाही लाजराच्या मृत शरीराला दुर्गंधी येत असेल सक्की बहीण म्हणते दुर्गंधी येशूला नाहीयेत प्रियांनो येशूला नाहीयेत देवाच्या प्रिय लोकांनो उदळ्या पुत्र ज्यावेळेस घरी रिटर्न आला काय अवतर असेल त्याचा हालेलुया शेंगा आठवत की नाही तुम्हाला लेलया कुठून कुठून कसा कसा फिरून आला असेल बापाने त्याला मिठी मारली प्रियांनो त्या बापाला तुमची दुर्गंधी येत नाही सोडणारे आपण आहे तो प्रभू कधीच आम्हाला सोडत नाही तो आमचा कधी त्याग करत नाही आणि म्हणून आम्ही प्रभूला धरून राहिलं पाहिजे बापाच्या घरी पंच पकवान आहे बापाचं घर सोडलं शेंगा बायबल वाच वाचणाऱ्या लगेच कळेल खूप डिटेल स्टोरी सांगायची गरज नाही बापाच्या घरी पंच पकवान आहे घर सोडलं की शेंगा फिक्स आहे बापाच्या घरी सोन्याचे रस्तेत त्याच्यानंतर जर ते सोडलं ती रुपये मिळतील आणि त्याच्यावर एक नेकलेस फ्री येऊद्याला लटकला डायरेक्ट बापाचं घर नाही सोडायचं किती लोक आमेन म्हणतील हालेलुया प्रभू मध्ये आम्हाला टिकून राहणं फार गरजेचं आहे उत्पत्ती आ 22 मध्ये बायबल सांगत पृथ्वी राहील तो वर पेरणी व कापणी थंडी व ऊन उन्हाळा व हिवाळा दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाही पृथ्वी आहे तोपर्यंत हे होत राहणार आहे असच प्रत्येक गोष्ट देव बापाने सेट केलेली आहे ठरवलेली आहे जोपर्यंत तुम्ही प्रभूमध्ये आहात तुम्ही सुरक्षित आहात जोपर्यंत तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तुमच्यामध्ये जीवन आहे जोपर्यंत येशू मध्ये आहात तुम्ही सामर्थ्यवान आहात येशूला सोडलं सामर्थ्य गेलं हालेलुया येशू मध्ये राहिलात तर तुम्ही सैतानाचा फज उडवून टाकाल किती लोक आमीन म्हणतील शैतान का फज निकाला हम सबको पावर आ गया हालेलुया त्याचा फज काढून टाका प्रभू मध्ये राहिल्याने सामर्थ्य प्रभू मध्ये राहिल्याने आशीर्वाद आहे प्रभू मध्ये राहिल्याने आमच्या जीवनाच कल्याण होणार आहे त्याच्या संपर्क त नेहमी आम्ही राहिल पाहिजे प्रभू बरोबर संपर्क तुटता कामा नाही कधी कधी आम्हाला वाटत मी देवापासून दूर गेलोय का तो क्षण अजून पुढचा वेळ बघू नका की अजून मी लांब जाईल आणि परत पश्चाताप करून येईल नाही ज्या क्षणी वाटलय माझं प्रार्थना जीवन कमी झालय परत प्रभूकडे धाव घ्या प्रियांनो परत वेळ द्या प्रभूसाठी परत गुढ्यावरती या आणि रिस्टोरेशन करा ते संपर्क कशानेही तुटता कामानत आमेन प्रभूच्या संपर्कात आम्हाला टिकून राहायचं उज राजाक थोर होता परमेश्वराने त्याच कल्याण केलं अरे पण कुठवर कल्याण केलं बायबल सांगत पहा दुसरे इतिहास 26वा अध्याय पाचव वचन सेकंड क्रोनिकल चप्टर 26 फ दुसरे इतिहास 26 पाच देवाचे दृष्टांत जाणणारा जखऱ्या याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे उजिया राजा देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले किती लोक आमेन म्हणतील जोपर्यंत देवाच्या भजनी उजिया राजा लागला तोपर्यंत देव बापाने त्याचं कल्याण केलं ज्या दिवशी भजन बंद त्या दिवशी कल्याण बंद किती लोक आमीन म्हणणार त्या गोष्टीला प्रभूच्या सानिध्यात टिकून राहिलेले आशीर्वाद आहेत प्रभूला सोडलं म्हणजे आशीर्वादाचे दरवाजे स्वतः बंद केल्यासारखे आहेत प्रभूच्या सानिध्यात प्रभूच्या संपर्कात प्रभूच्या कृपेत आम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे हालेलुया आपल्यावरती आलेला आत्मा आपल्याला सोडून जाता काम नाही किती लोक आमेन म्हणतील दुनिया नाखुश झाली तरी चालेल देवाच्या आत्म्याला कधी खिन्न करू नका लोक नाराज झाले तरी चालतील पण कधीच प्रभूच्या आत्म्याला खिन्न करू नका जे देवाने वचन दिलेल आहे त्या वचनाला धरून रहा किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला हालेलुया जे सामर्थ्य देवाने दिलय जो अभिषेक देवाने दिलेलं आहे जी कृपा देवाने दिलेली आहे जी कृपा दान दिलेली आहे जे प्रभूपासून मिळालंय त्याच्यामध्ये दृढ रहा त्या गोष्टी कधीही सोडू नका. आपलं बायबल कधी सोडू नका किती लोक आमीन म्हणताया गोष्टीला हालेलुया देवाच्या प्रिय लोकांनो एक तुम्हाला सुंदर घटना सांगतो डेसमन डॉस नावाचा एक व्यक्ती होता सगळ्यांनी म डेसमन डॉस 199 त्याचा जन्म झाला अमेरिकेमध्ये चांगला मुलगा चांगल्या घरातला त्याचा बाप डेसमन डॉसचा बाप आर्मीमध्ये महायुद्ध पहिलं त्याच्यातला तो एक शिपाई होता आणि खूप लढाया लढला तो काळ असा होता ना की एवढी फायरिंग एवढे काय म्हणतात त्याला लोकांचे जीव गेले एवढ्या भयंकर घटना घडल्या की त्याच्यामुळे बहुतांशी जे आर्मीचे लोक होते ते एका डिप्रेशन मध्ये होते त्यांच वागणं नंतर पुढं थोडं तणावाखालीच असायचं आणि असच हा डेसमन डॉगचा बाप पण थोडासा इरिटेट झाला होता रोज दारू पिणं घरात मारहाण करणं लेकरांना मारणं आणि पत्नीला मारणं ह्या सगळ्या गोष्टी त्या घरात घडत होत्या आणि मग एक दिवस असा आला की हा लहान मुलगा डेसमन डॉस आपल्या घरात बापाचा मार खातोय आणि जे आई बापाची भांडण ऐकतोय त्याच्यात पण राग भरत गेला राग भरत गेला तो पण जरा थोडासा बापासारखा व्हायला लागला कधी कधी बापांना आनंद वाटतो माझा मुलगा माझ्यासारख्या शिव्या देतो आहे ना कधी कधी खुश होतात बाप हा पण मुलगा डेसमन डॉस बापासारखा झाला रागाने भरला आणि आपल्या भावाशी त्याच भांडण झालं एक दिवशी घरात भावा भावांची होतात तशी त्यांच पण भांडण झालं आणि या रागात या डेसमनने काय केलं की एक वीट उचलली डायरेक्ट भावाच्या डोक्यात अशी घातली रक्त बंबाळ केलं त्याला आणि त्याला वाटलं आता मी माझ्या भावाचा खून केलाय आईबाप आले त्या मुलाची मलमपट्टी केली कसा तो वाचला आणि त्या दिवशी त्याच्या मनात एवढा धाग बसला की मी माझ्या भावाचा जीव घेत होतो आणि मग नंतर तो काही दिवस त्याच गोष्टीच्या विचारांमध्ये आणि तनावत होता आणि कुठे एका ठिकाणी तो असताना एका भिंतीवरती त्याला चित्र दिसलं आणि ते चित्र होतं काईन आणि हाबेलाच आणि ते चित्र पाहून त्याच्या मनात एवढं ओझ आलं की हे जगाच्या सुरुवातीचे जे लोक आहेत कुणाकडून त्याला माहिती कळाली की हे कोण होते त्यांनी कसा एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केला अरे मी तर त्या काहीच्या स्वभावाचाच मला बदलायला पाहिजे त्या लहान लेकराने विचार केला आणि त्याने प्रभूच्या सानिध्यात वाढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि जस जसा तो प्रभूच्या सानिध्यात वाढत होता एक दिवशी परत असच त्यांच्या घरामध्ये भांडण झालं डेसमनच्या बापाने त्या दिवशी हातामध्ये रिवॉल्वर घेतली आणि त्या दिवशी तो कोणाचा रक्तपात करण्याच्या तयारीमध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या आईने डेसमंडच्या आईने ती बंदूक हातातून हिसकावली आणि डेसमंड कडे दिली तुझा बाप आपलं खून करून टाकील जाऊन कुठेतरी बंदूक जाऊन लपव त्यानी नी ती बंदूक घेतली तो धावत बाहेर गेला गार्डनमध्ये कुठेतरी त्याने गवतामध्ये ती बंदूक लपवून टाकली आणि परत तो घरात आला आणि त्या दिवशी वातावरण शांत झालं आणि त्याला त्या दिवशी एक गोष्ट कळाली की जर माझ्या बापाच्या हातातून बंदूक घेतली नसती तर आज कितीतरी लोकांचे जीव घरामध्ये गेले असते काही वेळात पोलीस आले पोलीस त्याच्या बापाला पकडून गेले सगळे जे घटना घडत होती शेजार पाजारची पाहत असतील आणि त्या परिस्थितीने त्याच्या मनावरती फार विपरीत परिणाम केलेला होता त्या दिवशी डेसमणने एक निर्णय घेतला मी माझ्या आयुष्यात कधीच शस्त्र उचलणार नाही किती लोक आमेन म्हणतील ज्या पेत्राला प्रभूने तलवार मॅन करायला सांगितली त्याचा तोच अभिषेक किंवा ते शब्द त्याच्या जीवनात त्यांनी मान्य केले आणि प्रभूच्या मार्गावर चालण्याचा त्यांनी निर्णय घेतला हा लहानसा मोठा होतोय आणि परत एकदा जपानने अमेरिकेवरती हल्ला केला आणि देशामध्ये मध्ये सगळ्यांना सांगण्यात आलं की देशाला शिपायांची गरज आहे डेसमन म्हटला की मी माझ्या देशासाठी काहीतरी करायला तयार आहे हा पण गेला आर्मीमध्ये आणि ज्यावेळेस डेसमन त्या आर्मीमध्ये भरती झाला प्रियांनो त्या ठिकाणी सगळी जी त्याची तयारी होती ग्राउंडवरची सगळ्या तयारी एकदम सुंदर रीतीने खूप आउटस्टँडिंग त्याचा परफॉर्मन्स आणि एक दिवशी आला की त्या दिवशी त्याला सांगितलं की आता आजपासून तुमची टेस्ट आहे तुम्हाला फायरिंग करायला शिकवणार आहेत तो म्हटला मी शस्त्राला हात लावणार नाही तुम्ही ऐकता चर्च मी युद्धावर जाईल मी बंदूक घेऊन जाणार नाही मी माझं बायबल घेऊन जाणार आहे तू आलास कशाला युद्धासाठी नाही मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय त्याच्यावरती खूप प्रेशर आणण्यात आलं ज्या मुलीबरोबर त्याचं लग्न ठरलं होतं ती पण त्याला समजवत होती घे डेसमन घे बंधू काही नाही होत घे देशासाठी लढायचं घे तो म्हटला नाही माझ्या प्रभूला वायदा केलाय मी हत्यार उचलणार नाही माझा हत्यार माझं बायबल आहे मी माझं बायबल सोडणार नाही तुझी कोर्ट मार्शल करू तुला असं करू त्याला धमक्या यायला लागल्या त्याला जेलमध्ये टाकलं बेसमेंटचा बाप तिकडे बेचैन झाला मुलगा जेलमध्ये चाललाय काय करायचं त्याच्यासाठी आणि त्याच्या टाईम मधले जे लोक त्याच्याबरोबर युद्ध लढणारे होते त्याच्यातल्या मोठ्या अधिकाऱ्याला त्याने संपर्क केला त्याच्याकडून लेटर घेतल माझ्या मुलाला सोडवा आणि त्याला युद्धावरती जाऊ द्या पण त्याच्या हातात बंदूक नाही त्याच्या हातामध्ये बायबल द्या हालेलुया मोठ्या अधिकाराने त्याच्यावर सही दिली लेटर घेऊन त्या ठिकाणी कैदेत असलेल्या मुलाला सोडवायला बाप गेला आणि बापाने लेटर दाखवलं मुलाला सोडून आणलं आणि मुलाला युद्धावरती पाठवलं जपानने हल्ला केल्याची स्थिती आहे युद्धावरती मुलगा गेलाय आणि ज्यावेळेस तिथे युद्धाची तयारी चालू आहे बाकीचे सगळे सैनिक त्याला फार तुच्छ समजतायत काही सैनिकांनी त्याला मारलं तुझ्यात हिम्मत नाही तू घाबरट आहे मोठ्या अधिकाऱ्याने त्याला मारलं त्याला म्हटलं की तुझ्यात हिम्मत नाही तू कशासाठी आलास तो म्हटला नाही मला मदत करायची आहे जेव्हा लोक कोणी घायळ होतील आपले मी जाऊन त्यांना मदत करेल पण मी बायबल घेणार मी हत्यार घेणार नाही देवाच्या प्रिय लोकांनो मोठी स्टोरी एकदम शॉर्ट करतो आणि मग एक समय असा आला की हा तिथे पोहोचलाय त्याच्याकडे बायबल आहे डेसमन कड ते बायबल घेऊन रणांगणावरती त्या युद्ध भूमीवरती पोहोचलाय इकडचे लोक फायरिंग करतात तिकडचे फायरिंग करतात एक चड होता आणि त्या चढाच्या पलीकडे वैरी थांबलेले होते चढून कसेतरी हे सगळे वरती पोहोचले वरती सगळा दारू गोळा आणि वरती सगळे एकदम फायरिंग चालू आहे असं त्या ठिकाणी चित्र होतं आणि त्या ठिकाणामध्ये तिकडून फायरिंग होते इकडून इतकं हे सगळे प्रयत्न करतायत अमेरिकेचे सैनिक वाचवण्यासाठी परंतु ते त्या ठिकाणी अपयशी ठरत होते आणि त्या प्रसंगामध्ये जपानच सैन्य स्ट्रॉंग ठरलं आणि इकडच जे सैन्य होतं ते पळून गेलं पण त्या पळून गेलेल्यामध्ये बेसमंड नव्हता तो तिथेच थांबला प्रियांनो जे जखमी आहेत त्यांना वाचवण्यासाठी सगळ्यांची मलमपट्टी करतोय आणि खांद्यावर एका जणाला घेतलं आणि तो रिटर्न निघाला दोरीने त्याला सोडायचं खाली आता वरून खाली आणि त्याला कळालं की हा मरण पावलाय त्याचं मन तुटलं प्रभू मी कशासाठी आलो इथ एक तरी जीव मला वाचवत येऊ दे एक तरी प्राण मला वाचवता येऊ दे तो धावत गेला कुठूनतरी आवाज आला त्याला वाचवा वाचवा हेल्प हेल्प धावत गेला त्याने मलमपट्टी केली त्याला धरलं त्याला घेऊन धावत गेला त्याला खाली सोडलं त्याला सोडल्यावर तो प्रभूला म्हणतो अजून एक जणाला वाचवायचंय मला अजून एक जण देवा बास झालं अजून एक दे प्रभू एक दे परत कुठेतरी त्याला आवाज येतो वाचवा मला वाचवा तिथे जातो तो त्यांचा जखमा बांधतो त्याला घेतो खाली आणून सोडतो आणि परत म्हणतो देवा अजून एक तरी वाचवता येऊ दे अजून एक तरी वाचवता येऊ दे खालचे सगळे विचार करतात हा कोण मूर्ख आहे वरती फायरिंग चाललेली आहे आणि हा फक्त जीव वाचवायचं काम करत आहे आणि स्वतःची बंदूक नाही घेतली बायबल घेऊन वरती तिथे लढायला गेलाय देवाच्या प्रिय लोकांनो डेसमंड त्या दिवशी फक्त एक एक व्यक्तीला आणून सोडवत होता आणि फक्त देवाला म्हणत होता अजून एक जणाला वाचू दे त्या रात्री त्याने 75 लोकांचे जीव वाचवले प्रियांनो हालेलुया 75 लोकांचे जीव वाचून ज्यावेळेस जसं खाली आला सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि सगळे बोलत होते तू घाबरत नाही घाबरट आम्ही आहोत ज्याच्याकडे प्रभूच वचन आहे तो व्यक्ती घाबरट असू शकत नाही ज्याच्याकडे प्रभूचा आत्मा आहे तो व्यक्ती जीव वाचवणार आहे देवाच्या प्रिय लोकांनो परत दुसऱ्या दिवशी युद्धाची सुरुवात झाली आता जे लोक त्याला म्हणायचे हा डरपोक आहे घाबरट आहे त्या लोकांनी काय म्हटलं आम्हाला काही करा पण आमचा डेसमंड आमच्या बरोबर पाहिजे तो बरोबर असला की आम्हाला हिम्मत येते हा तरुण मुलगा आमच्या बरोबर द्या आणि डेसमंडला ते घेऊन त्या ठिकाणी गेले ज्यावेळेस युद्ध सुरू झालं डेसमंडने पाहिलं की एक बॉम्ब तिकडून आलेला आहे डेसमंडने त्या बॉम्बला लात मारली तिथेच ब्लास्ट झाला त्याच्या पायाला इजा झाली बाकीचे म्हटले डेसमंड तू आतापर्यंत आम्हाला वाचवलस आता आमचा टाईम आहे आम्ही तुला वाचवणार चला उचला रे उचला डेसमला स्ट्रेचरवर घेऊन जायला लागले डेसम म्हणतो माझं बायबल कुठे आहे मी तिकडे होतो ना पडलो तिथेच माझं बायबल असेल मला माझं बायबल पाहिजे मला माझं बायबल पाहिजे मला बाकी काही नको माझा जीव गेला तरी चालेल पण मला माझं बायबल पाहिजे बायबल त्याला आणून दिलं आणि मग ते जवळ धरलं आणि म्हटलं की मी आता वाचणार त्याला घेऊन गेले देवाच्या प्रिय लोकांनी युद्ध संपलं काही दिवसात डेसमट बरा झाला आणि जेव्हा तो बरा झाला अमेरिकन गव्हर्मेंटने बेस्ट सोल्जरचा अवॉर्ड त्याला दिला बिना बंदुकीचा अवॉर्ड बेस्ट सोल्जर बायबल तुमचा हत्यार आहे देवाच वचन तुमच सामर्थ्य आहे बायबल कधी सोडू नका प्रभूच्या वचनाला पहिलं प्राधान्य द्या हालेलुया वचन सोडू नका वचन तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येणार आहे प्रभू तुमच्यासाठी आशीर्वाद आणणार आहे प्रभूच सामर्थ्य तुमच्या जीवनासाठी फार मोठा आहे देवाच्या प्रिय संत गणांनो देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो प्रभूच्या संपर्कात राहिल्याने एकनिष्ठ राहिल्याने आमचं जीवन आशीर्वादीत झाल्याशिवाय राहत नाही आमच्या जीवनामध्ये पहिलं स्थान आम्ही प्रभूला दिलं पाहिजे प्रभूशी कनेक्ट राहिलं पाहिजे.
ज्यावेळेस मोश युद्धावरती होता निर्गम सरावा अध्याय आठ ते सोळ वचनांमध्ये मग अमालेक येऊन रफ येथे इजराईल लोकांशी लढू लागला तेव्हा मोशेने यहोशावाला सांगितले आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन आम्हा लेकाशी युद्ध कर उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहील देवाची काठी अरुणाची काठी देवासाठी एवढी वापरली का ती मोशेची काठी राहिली नाही ती अरुणाची काठी नाही राहिली ती आता देवाची काठी झाली काठी देवाची होती माणसं देवाची होणार नाहीत का हालेलुया प्रभू बरोबर राहिल नाही ती प्रॉपर्टी देवाची बनते किती लोक आमीन म्हणणार आहेत हालेलुया माणस पण जेव्हा ते देवाच्या सानिध्यातले लोक त्यांना देवाचा माणूस म्हणून ओळखतात हालेलुया हे देवाच दासी आहे हा देवाचा दास आहे प्रभूच्या उपस्थितीत हा अनुग्रह आहे प्रियांनो किती अद्भुत सामर्थ्य मोशेच्या सांगण्याप्रमाणे यशवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला मोशे अहरून आणि हर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले त्यावेळी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इजराईला सरशी होई सगळ्यांनी हात वर करा म मोश आपले हात वर करी तेव्हा इजरायलाची सरशी होई आन येशू मसी की हात वर करणं म्हणजे काय माहिती का खूप गहन अर्थ त्याचा रस्त्याने तुम्ही चालता हात कुठे असत तुम्ही काही काम करता चाललायत रस्त्याने बसलात हाताच डायरेक्शन नाशिक मध्ये कोणी असं नाही ना हॅलो हाताच डायरेक्शन देवा आम्ही मातीतून आलोय आम्ही खालचे लोक आहेत आम्ही खालच्या पातळीचेत आम्ही हे हात वर केले तर आमची पातळी उंच झाली देवा आम्ही स्वर्गाशी कनेक्टेड लोक आहोत हालेलुया मी इकडच नाही मी तिकडचा आहे तुम्ही ऐकताय चर्च प्रार्थनेत हात वर करणारे लोक कधीच जीवनात खाली बघायची वेळ येत नाही हालेलुया मोशेने हात वर केले जसा हात वर ठेवायचा इजराईल लोक जिंकायचे आता काय व्हायचं हळूहळू हात खाली येत असतील गळून गेले हात असे हात खाली यायला लागले का तिकडे इजराईल लोक हरायला सुरुवात व्हायची हालेलुया प्रेज लॉर्ड जोपर्यंत स्वर्गाशी कनेक्ट तोपर्यंत विजय निश्चित हात खाली आले का लगेच इजराईल लोक हरायला सुरुवात व्हायची करायचं काय तो आपले हात खाली करी तेव्हा अमालिकाची सरशी होई मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व त्यावर तो बसला आणि अहरोन आणि हूर ह्यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले म्हणून सूर्य मावळे पर्यंत त्याचे हात स्थिर राहिले मग यहोशावाने आपल्या तरवारीच्या धारेने अमालेकाच्या व त्याच्या लोकांचा पाढाव केला आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशवाच्या कानी घाल कारण मी आम्हाले एकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकी हालेलुया प्रेज द लॉर्ड अजिबात पुसून टाकेल याचा अर्थ काय जेव्हा देवाचा दास मोशे आपले हात वर करतोय हात गळाले अहरून आणि हर दोघे जण बरोबर आहेत किती लोक आमेन म्हणतील प्रत्येक व्यक्ती बरोबर अहरून आणि पाहिजेत हालेलुया बोला येशू मसी की अरुण आणि हूर हे असे लोक आहेत एखादा प्रार्थेत थंड पडायला लागला की त्याला थंड पडू देत नाही अशा लोकांनी तुम्हाला हाकलल तरी त्यांना सोडू नका कारण त्यांच्यामुळे तुमचे बॅटरी फुल चार्ज आहे त्यांच्यामुळे तुमच्या जीवनावरती आशीर्वाद आहे जे प्रभूमध्ये तुम्हाला ज्वलंत ठेवणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल देवाला धन्यवाद द्या आण जे विजवणारे आहेत दोघच की दुरी मास हालेलुया थोड लांब राहायचं त्या लोकांपासून जे तुम्हाला आत्म्यात खिन करणारे आहेत देवाच्या प्रिय लोकांनो अरोन आणि यांनी मोशेचे हात उंच धरून ठेवले आणि इजरायलाची सरशी झाली आणि यहोशवाला परमेश्वराने मोठ यश दिलं आणि परमेश्वर म्हटला की आम्हालेकाची सगळी आठवणच मी बुजवून टाकेल वैऱ्याचा हंड्रेड परसेंट नाश करून टाकेल देवाच्या प्रिय लोकांनो आमचं कनेक्शन आमचं कॉन्टॅक्ट देवाबरोबर स्थिर राहणं गरजेच आहे थोड्या कालावधीसाठी नाही थोड्या वेळासाठी नाही सार्वकालिक रीतीने देवाशी आम्हाला कनेक्ट व्हायचं आहे मोशे जसा परमेश्वराशी कनेक्ट राहिला आणि त्याने त्या युद्धामध्ये जय प्राप्त करून घेतला आमच्या जीवनातल्या प्रत्येक समयामध्ये आम्ही देवाशी कनेक्ट पाहिजे आमच्या मुखात सदैव प्रभूच नाव पाहिजे निरंतर आमच्या मुखामध्ये येशूच नाव पाहिजे निरंतर आम्ही देवाच गौरव करावं ही परमेश्वराची इच्छा आहे तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यावेनिसी परमेश्वर माझा झेंडा असे ठेवले हालेलुया आणि तो म्हणाला परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यान पिढे युद्ध राहील कोणाशी युद्ध राहील परमेश्वराचे युद्ध आमचं नाही युद्ध आमच्या देवाच आहे हालेलुया हे प्रभू मी नाही लढू शकत तुला लढायच माझ्यासाठी ज्यावेळेस तुम्ही स्वर्गाशी कनेक्ट होता प्रभू तुमच्यासाठी अद्भुत काम करतो प्रभूशी कनेक्ट राहणं निरंतर त्याच्या सानिध्यात टिकून राहणं कधीही प्रभूपासून दूर न जाणं हे आमचं आद्यकर्तव्य असलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो पेत्र जेलमध्ये आहे आणि त्यावेळेस पेत्र झोपी गेलेला आहे पण मंडळी काय करत होती? प्रार्थना करत होती निरंतर मंडळी देवाच्या सानिध्यात जोडलेली आहे.
पेत्राला दूत पाठवून प्रेषित 12वा अध्याय 11 12 वचनामध्ये आपण तिथं पाहतो की त्या ठिकाणी प्रभूने अद्भुत काम केलं आणि परमेश्वराने पेत्राला जेलमधून सोडवलं देवाच्या प्रिय लोकांना ज्यावेळेस आम्ही कनेक्ट असतो देवाबरोबर त्यावेळेस आमच्यासाठी अद्भुत आणि महान चमत्कार घडतात काही लोक कनेक्ट होतात मध्ये डिसकनेक्ट होतात ती घरात खराब झालेली ट्यूबलाईट बघितली तुम्ही लुकलुकत राहते काही धार्मिक लोकांचा प्रकाश असा लुकलुकत राहतो कमी जास्त होतो आम्हाला फक्त सभांमध्ये चार्ज नाही व्हायचं आम्हाला प्रत्येक ठिकाणीच देवाच्या अभिषेकात चालायच आम्ही घरात असलो तरी तोच अभिषेक आम्ही दारात असलो तरी तोच अभिषेक चर्चला आल्यावर पण तो अभिषेक कुठेही गेलो तरी तोच अभिषेक शांतीचा संदेश संदेश देणारे कधी कधी अशांतीने वागताना पाहिलेत प्रियांनो तुम्ही स्टेजवर अभिषिक्त आहेत चांगली गोष्ट आहे पण तुम्ही लोकात उतरल्यावर पण तुम्ही अभिषिक्त दिसले पाहिजे तुमच्यातला ख्रिस्त नेहमी तुमच्यामध्ये झळकला पाहिजे उलट मी तर म्हणतो लोक जवळून ज्यावेळेस तुम्हाला बघतील त्यावेळेस तुमच्यातला ख्रिस्त अजून त्यांना झळकताना दिसला पाहिजे हालेलुया आमच्या जीवनातल सामर्थ्य सदैव एकसारखं टिकणार पाहिजे प्रियांनो नेहमी त्या प्रभूशी आम्ही कनेक्ट राहणं गरजेच आहे प्रत्येक समयामध्ये प्रत्येक वेळेमध्ये प्रत्येक आमच्या जीवनातील चड उतारांमध्ये आम्हाला प्रभूमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे स्वर्गाशी आमची नाळ जुडलेली आहे प्रियांनो किती लोक आमेन म्हणतील देवाशी कनेक्ट आहे माणसाकडून अपेक्षा करायचं सोडून द्या किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला हालेलुया प्रेज द लॉर्ड माणसांचे चेहरे बघत बसाल निराशा येईल प्रभूच्या चेहऱ्याकडे बघा हालेलुया तुमच्या जीवनातला खरा आनंद तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या प्रत्येक गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जातील तुम्हाला जे हवय ते परमेश्वर तिथून तुम्हाला देईल तुम्हाला कशाची वान पडणार नाही हालेलुया आमचं नात प्रभू बरोबर घट्ट झालं पाहिजे आम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही प्रभूमध्ये टिकून राहिलं पाहिजे काही लोकांचे लिमिट असतं इथपर्यंत नाही बोलायचं मग तिथून पुढे असं ढासळायचं खाली का बस एका ठराविक गोष्टीपर्यंत तेवढंच सहन करायचं पुढे नाही आणि काही लोकांच खूप हे असतं हे देवा हे माझ्याचसाठी का घडतय हे प्रभू मीच का तुला सापडलो आहे हे प्रभू माझ्याच जीवनात एवढे संकट का अरे तक्त अग्नीच्या भट्टीत पडल्याशिवाय ख्रिस्त तुला भेटायला नाही येणार रे बाबा तुला तिथं कळणार आहे की तुझा प्रभू तुझ्या बरोबर आहे घरात बसलास तोपर्यंत नाही कळणार सिंहाच्या गुहेत तुला कळणार आहे की तुझ्या देवाची तुला साथ आहे तुझ्या अडचणीत तुला कळणार आहे की प्रभूने तुला सोडलेलं नाही का पाहिजे फ्लॅटलाईन चडू तर पाहिजे जीवनामध्ये हालेलुया त्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रभू आमच्या बरोबर आहे याची आम्हाला खात्री होते प्रभू त्या जीवनातील बिकट प्रसंगांमध्ये तो आमच्या बरोबर आहे याची आम्हाला जाणीव होते त्या प्रसंगात आम्हाला कळतं की प्रभूने आमचा हात सोडलेला नाही येशू आरोग्य देणारा देव आहे बरं करणारा देव तुमच्या दुःखात यातनेत तुम्हाला कधीच एकट्याला सोडून जाणार नाही तो कधीच नाही जग सोडून जाईल जन्म देणाऱ्या आईला विसर पडेल पण माझ्या प्रभूला नाही पडत कधीच तो रोज आणि रोज आमचा भार वाहणारा परमेश्वर आहे तो आमच्यावर एवढं प्रेम करतो आम्ही फक्त त्याच्याशी एकनिष्ठ राहाव ही त्याची इच्छा आहे निरंतर त्याच्या सानिध्यात टिकून राहाव निरंतर निरंतर एकही क्षण आमच्या जीवनात असा असू नये की आम्ही देवापासून दूर गेलेलो आहोत मोशे स्वर्गाशी कनेक्ट डायरेक्ट विजय मिळाला काही लोक येतात प्रार्थना करा माझी अशी अशी अडचण आहे प्रार्थना केली जाते अडचण दूर होते पुढची अडचण येईपर्यंत परत चर्चलाच येत नाही देवा अशांना रोज अडचणीत ठेवतो खरच सांगतो मी तुम्हाला ज्या लोकांचे मन स्थिर नाही ते कंटिन्यू प्रॉब्लेम मध्ये एकदा तुमचा माइंड सेटअप झाला ना चूक असो दुःख असो काही असो मी प्रभूला सोडणार नाही अडचणी गायब जीवनात समस्याच तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला प्रत्येक गोष्ट असा प्रॉब्लेम आला की तुम्ही फुटबॉल बनवाल त्याचा चला आजा इधर देखताहु तेरेको हालेलुया तुमच्या अडचणी त्या अडचणीत तुम्हाला भीती वाटणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या पुढे चालणारा माझा प्रभू आहे हालेलुया माझ्या अडचणींचा मुकाबला माझ्या प्रभूशी होणार आहे युद्ध माझं नाही माझ्या प्रभूच आहे प्रभू बरोबर असला ना की आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे आम्हाला त्याच्यात टिकून राहायच योहान 14वा अध्याय 20साव वचन बायबल सांगत योहान 14 त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे हालेलुया आम्ही त्याच्यामध्ये तो आमच्यामध्ये आम्ही येशू मध्ये आहोत आणि येशू आमच्यामध्ये आहे एखाद भांड आहे पाण्याने भरलय पाणी येशू ते भांड आपण आमच्यात येशू भरलेला आहे आणि तेच भांड घेऊन समुद्रात टाकलं तर त्या भांड्याच्या आत पण पाणी आहे बाहेर पण पाणी आहे भांड्यामध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये भांड आहे असं ते गणित प्रियांनो आम्ही प्रभूमध्ये आणि प्रभू आमच्यामध्ये स्वतःला एवढं विलीन करून घ्या प्रभूच्या सानिध्यात देवाच्या प्रिय लोकांनो दुसरा कुठला मार्ग नाही प्रभूच्या सानिध्यात आम्ही टिकून राहावं आमच्या जीवनातले आशीर्वाद तर मोकळे होतीलच पण एक खरा स्वर्गीय आनंद प्राप्त होईल बऱ्याच जणांचा असं मत आहे की स्वर्गात गेल्यावर त्यांना खरी शांती मिळणार आहे. कुठे गेल्यावर लय लोक मरणाचीच वाट बघत असतात. हे देवा मला घेऊन जा या जगामधून आता कधी येतोस येशू घेऊन जा आम्हाला लवकर खूप कंटाळा आलाय मला या जगामध्ये स्वर्गात काय आहे देव बाप आहे देवदूत आहे सामर्थ्य आहे स्तुती आराधना आहे प्रभूच गौरव आहे प्रभू आहे म्हणजे मिरेकल आहे प्रभू आहे म्हणजे चिन्ह चमत्कार आहेत प्रभू आहे म्हणजे प्रकाश आहे प्रभू आहे म्हणजे देवा चा अग्नी आहे प्रभू आहे म्हणजे जयवंत जीवन आहे प्रभू आहे म्हणजे जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य आहे येशू आला सैतान पळून गेला हालेलुया इंटरव्ूला वेळ घालू नका जातोस का आता जाणार आहेस की नाही काही खाणार आहेस काही घेतोयस का इंटरव्ू बंद करा प्रियांनो हालेलुया प्रभूची उपस्थिती अंधकाराला धमकावणारी आहे किती लोक आमेन म्हणतील हालेलुया बो येशू मसी की आम्हाला प्रभू मध्ये टिकून राहायचं आणि हे जे नात प्रभू बरोबर आमचा आहे त्याच्यामध्ये फक्त संडे टू संडे ख्रिश्चन बनू नका फक्त थोड्या वेळापुरते ख्रिश्चन बनू नका सकाळची प्रार्थना झाली पाप करायला मोकळा असं जीवन जगू नका आम्हाला निरंतर प्रभूच्या सानिध्यात आणि सामर्थ्यात टिकून राहायचंय प्रत्येक क्षणोक्षणी आमच्याकडे कधीही प्रभूने पाहिलं तर त्याला आमच्यामध्ये त्याच प्रेम दिसलं पाहिजे त्याच सामर्थ्य आमच्यामध्ये दिसलं पाहिजे आमच्याकडे कुणीही पाहू निरंतर आमच्यामध्ये ख्रिस्ताची उपस्थिती पाहिजे प्रभू मध्ये आम्हाला टिकून राहायच प्रियांनो यावा तिसऱ्या अध्यायामध्ये किती सुंदर घटना आहे इजराईल लोक सगळं ओलांडत एवढाचा वर्षाचा प्रवास करून यार्देने जवळ आलेलेत आणि यार्देनेच्या जवळ येऊन इजराईल लोक आता ठप्प झालेत गपचूप बसलेलेत आणि इतके शांत झालेले आहेत की आता त्यांच्या मनात शोक आहे मोशे आम्हाला सोडून गेला नेहमी लक्षात ठेवा मोशे गेला तरी देव जाणार नाही प्रे लॉर्ड प्रभूचा काहीतरी प्लन असणारच 100 टक्के यहोशावाची निवड केली आणि परमेश्वर त्याच्याशी बोलत आहे आता उठ यार ओलांडून जा परमेश्वराची अशी कृपा की परमेश्वराने त्या अशा थंडीच्या दिवसामध्ये ती अर्धेन अशी दुथडी भरून वाहायची भरपूर पाणी लेकरं बाळ एवढा मोठा प्रपंच सगळ्या गोष्टी घेऊन पलीकडे जायचं कसं प्रश्न आहे मोठा तिसरा अध्याय यहोशावाचा आणि 14 वचन काय सांगत बघा लोक यार्देने पलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यातून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले इथे एक ना रहस्य आहे अजून यारदेन दुभागली नव्हती पण लोक यारदेन ओलांडायला निघाले होते किती लोक आमेन म्हणतील हालेलुया तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता ती प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात आली आहे या विश्वासाने काम करा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करता ती प्रार्थना ऐकली आहे परमेश्वराने उत्तर दिल आहे या विश्वासाने प्रार्थना करा अजून यार ओलांडणं बाकी लोक सगळे निघाले चला आपल्याला पलीकडे जायचं अरे पण यादन दुभागायची बाकी आहे अजून यारदेन नदी तिथेच आहे अजून आपण काय करायचं कशाला जायचं याजकाला सांगा पहिले यार दुभागून घे मग नंतर आम्ही येतो नाही आधी विश्वासाच पाऊल उचलाव लागेल किती लोक आमीन म्हणतील एक पाऊल तुम्ही उचला 99 पाऊल प्रभूवर सोडून द्या तो उचलणार आहे तुमच्यासाठी तुमचे चमत्कार तुमच्यासाठी घडायला तयार आहेत पहिलं पाऊल तुम्हाला विश्वासाच उचलाव लागेल तुम्हाला ख्रिस्तापती प्रभू प्रती तुमचा खरा विश्वास अतुट विश्वास तुम्हाला दाखवावा लागेल ज्यावेळेस सगळे लोक तिथून निघाले कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले कोश वाहणारे यार्देने पर्यंत येऊन पोहोचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले सुगीच्या दिवसात यार्दे नदी दुथडी भरून वाहत असते तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारताना जवळील आदाम नगराजवळ साठून चढले कुठलं नगर आहे सगळ्यांनी म्हणा आदाम नगराच नाव काय आदाम वावा आदाम नगराजवळ हे पाणी साठून चढले पाण्याची रास झाली तिकडून वाहत येतय आणि इकड परमेश्वराने बरोबर पाणी थांबवलय पाण्याची भिंत तयार झाली असल आणि पाणी तिकडून येणार वरती वरती वरती वाढत चाललेल आहे एक बाजूला आदम नगराजवळ पाणी साठून राहिलं प्रियानो आणि पुढे पहा त्याची रास झाली अस लिहिलं आणि जे पाणी अरबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र त्याला आणखीन एक नाव आहे मृतसमुद्र याकडे जात होते ते अगदी वाहून गेले मग ते लोक यरी हो समोर पार उतरून गेले नगराच नाव आदम आहे आणि तिकडे मृत्यू आहे मृतसमुद्र का म्हणतात मृतसमुद्र कारण त्याच्यात एक पण मास जगत नाही इतके शार आहेत त्याच्यामध्ये हालेलुया आधी सुरुवातीला पाणी घालेल समुद्रात येत त्याच्यामध्ये जीवन आहे मृत समुद्रामध्ये क्षार समुद्रामध्ये जीवन नाही आदाम नगरापासून ती नदी पुढे वाहत जाऊन मृत समुद्रापर्यंत जाते याजकांची पावल लागली नदीचे दोन भाग झाले प्रियांनो हालेलुया आदम नगराजवळ ते पाणी साठवून राहिलं देवाच्या प्रिय लोकांनो ज्या दिवशी याजकाची पाऊल लागली त्या पाण्याचे दोन भाग झाले ज्यावेळेस येशू आमचा महायाजक जगामध्ये आला आदमाचा संपर्क मरणाशी त्याने तोडून टाकला प्रियांनो हालेलुया मरणावरती त्याने आम्हाला विजयी केलं आणि जे जीवनाच पाणी वाहतय ते पाणी मानवाला म्हणजे आदामाला मिळालं ते तुम्हाला आणि मला मिळालं प्रियांनो हालेलुया आम्ही विजयी ठरलो याजकांची पाऊल त्या ठिकाणी लागली काय सुंदर पाऊल आहेत त्यांची हालेलुया काय वैशिष्ट्य त्यांच्या पावलत पावलत काहीच विशेष नाही त्यांच्या या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो सतराव वचन परमेश्वराच्या कराराचा कोष वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले आणि सर्व इजराईल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले अशाप्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देने पलीकडे निघून गेले आमेन हालेलुया देवाच्या प्रिय लोकांनो तो एक अद्भुत सामर्थ्याचा क्षण नहता अख राष्ट्र निघाले तेव्हा सहा लाख लोक होते पोहोचले तिथपर्यंत त्यावेळी 40 लाखापेक्षा जास्त लोक असतील लाखो लोकांना नदी ओलांडायची याजकांनी कराराचा कोष आपल्या खांद्यावर घेतलाय याजकांच्या पावलामध्ये काही खास नव्हतं जे त्यांनी खांद्यावर घेतलं ते खास होतं देवाची उपस्थिती जीवनात वागवणाऱ्या लोकांची पावलं एखाद्या ठिकाणी लागली तरी चि भिन्न चमत्कार घडतात हालेलुया उपस्थिती तुमच्या पावलांची महत्त्वाची नाही तुमच्या जीवनात जो देवाचा अभिषेक आहे त्याच्याद्वारे महान काम होतं किती लोक आमेन म्हणणार आहेत हालेलुया देवाच्या उपस्थितीपुढे कुठलाही सैतान थांबू शकत नाही कुठलेही अडखळण थांबू शकत नाही ती उपस्थिती घेऊन चालणारे लोक आम्हाला बनायच आहे त्यांनी खांद्यावरती घेतली आम्हाला जीवनामध्ये घ्यायची आहे ज्यावेळेस आमच्या जीवनात प्रभूचा अभिषेक आहे आमच्या जीवनात प्रभूचं सामर्थ्य आहे ज्यावेळेस आपण प्रभूच्या आत्म्याने भरलेला आहोत ज्यावेळेस आपण प्रभूच्या अग्नीने भरलेला आहोत आपण जिथे जाऊ तिथे प्रभूची उपस्थिती घेऊन जाणार आहेत हालेलुया आणि प्रभूची उपस्थिती आमच्यासाठी चांगल्या चांगल्या ठिकाणी जिथे अडचणी आहेत तिथून सगळे मार्ग मोकळे करणार आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड आज एखाद्या कामातून मार्ग निघत नाही हाताश होऊन जातात लोक काय करू मी खूप प्रयत्न केले तू कशाला प्रयत्न करतो तू प्रार्थना तर करून बघ येशूला एकदा सांगून तर बघ प्रभू माझी ही अडचण आहे ती दूर कर प्रभू स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकेल आणि देवाचे दूत खाली उतरतील प्रियांनो किती लोक आमेन म्हणतील देवाचे दूत खाली उतरतील आणि तुमच्या मार्गातले सगळ्या अडचणी दूर करतील बोले येशू मसी की देवदूत तुमच्या मदतीला येतात आणि तुम्ही प्रार्थना करत नाही बिचाऱ्यांना जॉबलेस ठेवलय तुम्ही ऐकताय तुम्ही स्वर्गात करतायत प्रभूची आराधना त्यांची ची इच्छा आहे की प्रभूने त्यांना आज्ञा द्यावी आणि त्यांनी तुमच्या मदतीला याव नदीचे दोन भाग झाले देवाची उपस्थिती मार्ग काढणारी देवाची उपस्थिती जयवंत करणारी देवाशी कनेक्ट राहायचे नुसतेच याजक आले असते ना कोष मागे ठेवून गटांगळ्या खाल्ल्या असते मी सांगतो तुम्हाला अभिषेक खरा असेल ना ऍक्टिंग करायची गरज नाही मग ते गल्ल्यात आलं तरी काही टेन्शन घ्यायचं नाही हालेलुया देवदूत तिथेच दाबून धरतील त्या तिकडूनच कर तू तिकडे तुझेटर वाढव इकडे येऊ नाही शकत इकडे पावर ऑफ गड आहे हालेलुया देवाचा अभिषेक इतक्या आत्म्यात भरले जा की प्रभूची उपस्थिती घेऊन चालणारे लोक तुम्ही बना याजक लोक खांद्यावर कोष घेऊन जायचे काय भारी वाटत असेल ना लोक भेटत अस अरे आज तू कोष घेतला देवाचा काय काय तुला खरच देवाने ब्लेस केला प्रभूच्या कोशाला हात लावणं काय सोपी गोष्ट नाही आज तुला देवाने प्रभूची इच्छा आहे की इथं बसलेल्या प्रत्येक ज्याच्या कानापर्यंत आवाज जातोय त्यानी प्रत्येकाने प्रभूची उपस्थिती घेऊन चालाव ही देवाची इच्छा आहे प्रत्येकासाठी देवाची इच्छा आहे की प्रत्येक जण प्रभूच मंदिर बनाव एक क्षण पण त्या प्रभू बरोबर आमचा वियोग नकोय हात उंच केले यश मिळत गेलं पाऊल लागलं नुसतं पाऊल टच नदीचे दोन भाग झाले जिथं अडचणी आहेत ना तिथं पाऊल लागतच तुमच्यासाठी मार्ग मोकळे होतील जे काम होत नव्हते प्रभूला बरोबर घेऊन जा तुमची सगळी काम होणार आहेत तुम्ही कशातच अपयशी ठरणार नाही प्रभूशी कनेक्ट व्हा.