मित्रांनो समाजामध्ये आपण ही एक गोष्ट नेहमी पाहत असतो की कुटुंबातील मुलीला अनेक प्रकारची बंधने घालून दिलेली असतात या बंधनाबरोबर मुलींचे काही अधिकार काही हक्क देखील हिरावून घेतले जातात अशाच अधिकारांमधील एक अधिकार म्हणजे वारसा अधिकार की जो खूप पूर्वीपासूनच समाजामध्ये तसेच अगदी सुप्रीम कोर्टामध्ये देखील वादाचा मुद्दा राहिलेला आहे परंतु जसे की प्रत्येक गोष्टीला बदल हवा असतो अगदी त्याचप्रमाणे हिंदू वारसा कायद्यामध्ये देखील बदल आणि सुधारणा आणि दुरुस्ती आली की ज्यामुळे किंवा ज्या दुरुस्तीच्या माध्यमातून मुलींना देखील कुटुंबातील मुलांनी एवढाच आणि समान वाटपाचा अधिकार दिला गेला आणि या अधिकारामुळे अनेक स्त्रिया कोर्टामध्ये वाटपाचा दावा दाखल करण्यासाठी जाऊ लागल्या त्यामध्ये
काहींना यश आले तर काहींना अद्याप आपल्याच वडीलोपार्जित प्रॉपर्टीसाठी किंवा त्यामधील वाटप मिळण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे मग कायद्याने तर वाटपाचा अधिकार दिला परंतु काय खरोखरच स्त्रीला तो अधिकार मिळाला का तर नाही मिळाला मग आम्ही यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला की कुटुंबातील मुलीला तिचा वारसा हक्क आजपर्यंत का दिला गेला नाही किंवा का मिळत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्या तर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबर वर whatsapp मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली
जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या youtube चॅनल लॉर्ड रेजर मध्ये मित्रांनो जसे की आपणा सर्वांना हे माहिती आहे की सन 2005 मध्ये हिंदू वारसा कायद्यामध्ये अमेंडमेंट केली गेली आणि कुटुंबातील मुलींना देखील मुलांना एवढाच अधिकार दिला गेला परंतु सर्वात मोठा आणि विचार करण्या जोगा प्रश्न हा होता की ह्या प्रॉपर्टी मधील अधिकार सन 2005 पूर्वीपासून धरायचा की सन 2005 नंतरचा हा अधिकार दिला जाईल कारण कायद्यामध्ये ही बाब स्पष्ट केली गेली नव्हती तांत्रिक दृष्ट्या प्रश्न असा होता हिंदू वारसा कायद्यामधील ही दुरुस्ती सन 2005 मध्ये आली तर त्यावेळेस जर एखाद्या मुलीचे वडील जिवंत नसतील
तर अशा मुलींना देखील वारसा हक्काच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार दिला जाईल का आणि हा प्रश्न एका तांत्रिक मुद्द्यावर आधारित होता कारण एखादी व्यक्ती ज्या दिवशी मयत होते त्या दिवसापासूनच त्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीमध्ये वाटप खुले आणि अगदी यावेळेसच पाहिले जाते की मयत व्यक्तीस वारस कोण कोण आहेत त्याचबरोबर सप्टेंबर 2005 मध्ये ही दुरुस्ती आलेली होती आणि यामध्ये ही एक गोष्ट स्पष्ट केली गेली नव्हती की ही दुरुस्ती सन 2000 पूर्वीपासून लागू राहील का सन 2005 नंतरच्या वारसांना लागू होईल आता या महत्त्वाच्या मुद्द्यावर सर्वात प्रथम तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने सन 2015 प्रकाश आणि इतर विरुद्ध फुलवती आणि इतर या न्यायनिर्णयामध्ये हे स्पष्ट
केले की सन 2005 सालची दुरुस्ती लागू होण्यापूर्वी जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल तर त्या मयत व्यक्तीच्या मुलीसाठी 2005 ची दुरुस्ती लागू होणार नाही त्यानंतर पुन्हा सन 2018 धनम्मा विरुद्ध अमर आणि इतर या मॅटर मध्ये पुन्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले की 2005 पूर्वी जरी एखादी व्यक्ती मयत असेल आणि त्या प्रॉपर्टीमध्ये वाटप केले गेले नसेल तर त्यामध्ये मुलींना मुलांना एवढाच म्हणजे समान अधिकार राहील मग एकाच मुद्द्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे दोन वेगवेगळे न्यायनिर्णय आलेले होते आणि सामान्य व्यक्तींमध्ये वकिलांमध्ये आणि अगदी जजेस मध्ये देखील पुरता गोंधळ उडाला होता की कायद्यामध्ये आलेली दुरुस्ती ही सोयीची आहे का
गैर आहे आणि या दुरुस्तीचा नेमका अर्थ कसा लावायचा त्यातच पुन्हा माननीय सुप्रीम कोर्टाने विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या 2020 मध्ये तीन जजेसचे बेंच नेमले की ज्या तीन जजेसच्या बेंचने हा न्यायनिर्णय दिला आणि निश्चित देखील केले की मुलींना प्रॉपर्टीमध्ये मुलांना एवढाच अधिकार दिला जाईल मग 2005 वडील जिवंत असो किंवा नसो याचा कोणताही फरक त्या प्रॉपर्टीच्या वाटपावर पडणार नाही मग आता प्रश्न हा उद्भवला की आता कायदा देखील बनला आणि हा कायदा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट देखील केला तरीही मुलींना प्रॉपर्टीमध्ये अद्याप अधिकार का दिला जात नाही तर या प्रश्नाचे उत्तर तीन कारणांना धरून आहे की ज्या कारणांबाबत
आपण आता चर्चा करूयात त्यापैकी सर्वात पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे या 2005 च्या दुरुस्तीमधील परंतुक होय बघा ही जी 2005 सालची दुरुस्ती आलेली होती त्यामध्ये एक परंतुक स्पष्टपणे नमूद केलेले आहे की 20 डिसेंबर 2004 पूर्वी जर मालमत्तेमध्ये हस्तांतरण झालेले असेल किंवा विभाजन झालेले असेल तर ही 2005 सालची दुरुस्ती त्या मालमत्तेला लागू होणार नाही आता हीच गोष्ट सोप्या भाषेमध्ये पाहिली तर समजा सुरेखाने तिच्या भावाविरुद्ध वडीलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये 2005 च्या दुरुस्तीनुसार वाटप मिळावे असा एक वाटपाचा दावा दाखल केलेला असेल आणि जर त्या प्रॉपर्टी संदर्भाने 20 डिसेंबर 2004 अगोदर वाटप किंवा अन्य हस्तांतरणाचे व्यवहार झालेले असतील तर या
दुरुस्तीमधील परंतुकानुसार सुरेखाला त्या प्रॉपर्टीमध्ये वारसा हक्क येणार नाही आणि तिला हा कायदा अस्तित्वात येऊन देखील त्या प्रॉपर्टी मध्ये वाटप मिळणार नाही आता दुसरे महत्त्वाचे कारण होते की फसवणूक घेणे किंवा खरेपणाने त्या मुलीचे हक्क सोडपत्र करून घेणे हे सर्वात मोठे कारण आहे की कुटुंबातील मुलीला प्रॉपर्टी मध्ये समान हिस्सा मिळत नाही हक्क सोडपत्र एकाच प्रकारचे असते ते म्हणजे रजिस्टर म्हणजेच नोंदणीकृत हक्क सोडपत्र परंतु माझ्या मते हक्क सोडपत्राचे मुख्यत्वे करून दोन प्रकार आहेत पहिला म्हणजे खरेपणाने करून घेतलेले हक्क सोडपत्र आणि दुसरा म्हणजे फसवणुकीने करून घेतलेले हक्क सोडपत्र जे हक्क सोडपत्र खरेपणाने केलेले असते ते त्या मुलीने स्वतःच्या इच्छेने
करून दिलेले असते आणि जे हक्क सोडपत्र मुलगी करून देत नसेल तर तिला नाना प्रकारे खोटे बोलून आणि फसवणूक करून हक्क सोडपत्र करून घेतले जाते आणि त्यानंतर ती मुलगी कोर्टामध्ये हक्क सोडपत्र रद्द करून आणि प्रॉपर्टीमध्ये वाटप मागण्यासाठी जाते त्यावेळेस हक्क सोडपत्र खोटेपणाने झाल्याचे ती सिद्ध करू शकली तर ठीक आहे परंतु झालेले हक्क सोडपत्र खोटे आहे हे ती सिद्ध करू शकली नाही तर निश्चितच तिला वाटप नाकारले जाते आणि एवढा चांगला कायदा अस्तित्वात असूनही त्या मुलीला तिचा वारसा हक्क किंबहुना वाटप मिळत नाही आता यामध्ये असाही अपवाद असण्याची शक्यता असते की स्वइच्छेने हक्क सोडपत्र करून दिलेले असते आणि नंतर
ते खोटे असल्याचे कोर्टात सांगून वाटप मागितले जाते तर हे कृत्य नीतिमत्तेला धरून असे नाही आणि आता तिसरा आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपणाकडे किंवा आपल्या समाजामध्ये प्रचलित असणारे काही रोम रा बघा आपण समाजामध्ये नेहमीच पाहत असतो आणि हे अनुभवतो देखील की समाजामध्ये आधुनिकीकरण आणि स्त्री सबलीकरण दिसत असले तरी स्त्रीला काही अंशी आणि तुलनात्मक रित्या पुरुषांपेक्षा कनिष्ठच मानले जाते आता ही गोष्ट प्रत्येक समाजासाठी किंवा प्रत्येक कुटुंबासाठी लागू होईल अशातला भाग नाही त्याचबरोबर अनेक ठिकाणी असेही पाहण्यास मिळते की आम्ही तुला लहानाचे मोठे केले चांगला खर्च करून लग्नही लावून दिले सासरी तू आनंदी आहे तर माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये तुझे हक्क
अधिकार भावाच्या लाभामध्ये सोडून दे आणि भावाच्या प्रेमापोटी आणि आपुलकीच्या भावनेपोटी ती बहीण तिचा हक्क भावाच्या लाभामध्ये सोडून दे आणि मला यामध्ये काही गैरही वाटत नाही कारण आपली संस्कृती तेवढी चांगली आणि पथदर्शक देखील आहे परंतु जर त्या मुलीचे सासरकडील लोक चांगले नसतील तिला जाच करत असतील आणि ती माहेरी परत आली तर जोपर्यंत आई-वडील हयात असतात तोपर्यंत तिला व्यवस्थित सांभाळले जाते परंतु त्यांच्या पश्चात तिला व्यवस्थित पाहिले जात नाही आणि मग असे वाटते की प्रॉपर्टी मधील काही भाग आपणास वाटपामध्ये मिळाला असता तर त्या प्रॉपर्टीमध्ये पीक घेऊन किंवा ती प्रॉपर्टी विकून उदरनिर्वाह तरी झाला असता म्हणजेच काही रूढी आणि
परंपरा यामुळे देखील हा कायदा अस्तित्वात असताना मुलींना प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मिळत नाही तर मित्रांनो अशाप्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन कारणे पाहिलीत की ज्यामुळे मुलींना हिंदू वारसा कायद्यामध्ये सन 2005 एवढी चांगली दुरुस्ती येऊ नये अद्याप वाटप अथवा वारसा हक्क मिळत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर मध्ये तोपर्यंत नमस्कार