आता राज्यातल्या शाळांमध्ये सुद्धा सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येणार आहे गेल्या काही वर्षांपासून पालकांचा आपल्या मुलांना सीबीएससी बोर्डाच्या शाळेत टाकण्याचा कल वाढलेला आहे त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील प्रवेशांचे प्रमाण कमी होऊ लागलंय त्यामुळे आता शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे पुढच्या वर्षीपासून राज्यातील शाळांमध्ये सुद्धा आता सीबीएससी पॅटर्न असणार आहे म्हणजेच थोडक्यात राज्य शिक्षण मंडळाचा जो पॅटर्न होता जी शिक्षण पद्धती होती त्या शाळांमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचं प्रमाण कमी झालेलं होतं सीबीएससी पॅटर्नला मागणी वाढलेली होती आणि त्यामुळेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाबाबतची माहिती दिली
आहे पुढच्या वर्षीपासून सीबीएससी चा अभ्यासक्रम आता राज्यातल्या शाळांमध्ये शिकवला जाणार आहे बोर्ड एसएससी राहणार माध्यम मराठी राहणार किंवा सेमी इंग्लिश राहणार सीबीएससी चा अभ्यासक्रम याच्यामध्ये ज्या परीक्षा होतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्याला सीबीएससी चा अभ्यासक्रम असतो तो जर अभ्यासक्रम आपली मुलं शिकली तर नॅचरली त्यांना मदत होईल ते अधिक ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतील आणि दुसरा आम्ही पूर्वीच कसं होतं की बेरोजगारांचे तांडे निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था होती आम्ही केवळ सीबीएससी चा अभ्यासक्रम स्वीकारत नाही तर सीबीएससी च्या पुढे जाऊन आम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम कंपलसरी करतोय नेमका या निर्णयामागचा विचार काय आहे कशाप्रकारे त्याची अंमलबजावणी असणार आहे जाणून घेऊया चांगल्या शिक्षणासाठी सीबीएससी
शाळांकडे कल वाढतोय राज्यातल्या शाळेतही सीबीएससी चा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे स्पर्धा परीक्षेत या निर्णयामुळे मुलं मागे पडणार नाहीत असा सरकारचा विचार आहे तर इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे पुढील वर्षापासून शाळांमध्ये राज्याच्या बोर्डाच्या शाळांमध्ये सीबीएससी चा अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात होणार आहे