नमस्कार मंडळी आमची माती आमची माणस या चॅनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की वेखंडाची शेती वेखंड औषधी वनस्पती आहे आणि मित्रांनो ही साधारण आर एसी या कुळातील आहे तिला मराठीमध्ये वेखंड म्हणतो आपण आणि हिंदीमध्ये बच किंवा धूळ बचड आणि संस्कृत मध्ये त्याला वचा उग्रगंधा जटिला आणि उग्र वामणी अशी नाव आहेत आता या वेखंडाचे खोड जमिनीखाली एकाच दिशेने 60 सेंटीमीटर पर्यंत लांब वाढत असतं त्यावर तांबूस रंगाचं आवरण असतं आणि या वेखंडाचं पीक एका वर्षातही घेता येते वेखंडाची पाने साधारणतः 45 ते 60 cm पर्यंत उंच वाढतात पाने गर्द हिरवी आणि चकचकीत तसेच
किंचित मांसल असतात वेखंडाच्या कंदाप्रमाणेच पानांनाही सुगंध असतो ही वनस्पती 6000 6000 फूट उंचीपर्यंत तसेच काश्मीर नागालँड मणिपूर कर्नाटक या प्रदेशात आढळते आणि श्रीलंकेत तसेच भारतात बऱ्याच ठिकाणी वेखंडाची लागवड केली जाते त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याची औषधी वगैरे उपयोग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शेतकरी बांधवांनी खरं म्हणजे या शेतीकडे आता वळायला काही हरकत नाही आता याची लागवड पद्धत किंवा याचा हवामान आणि जमीन आपण बघितलं तर ही वनस्पती समशीतोष्ण हवामानात चांगली येते या वनस्पतीला भाताप्रमाणेच भरपूर पाऊस आवश्यक असतो व्यखंडाचे पीक तलावाच्या किंवा नदी नाल्याच्या काठी गाळाच्या पांथळ जमिनी तसेच भात खाचरात चांगले येऊ शकते या पिकासाठी भारी अथवा
पोयट्याची ओलावा धरून ठेवणारी जमीन योग्य असते आता पूर्व मशागत आणि लागवड बघितलं तर हे वर्ष हे पीक वर्षभर किंवा वर्षापेक्षा जास्त काळ जमिनीत राहत असल्यामुळे जमीन चांगली नांगरून कुळवून आणि भुसभुशीत करावी हेक्टरी वीज गाड्या कुजलेलं शेणखत मिसळावं लावणीचा हंगाम सामान्यपणे मार्च एप्रिल असतो परंतु सिंचनाची सोय असल्यास वर्षा वर्षभर म्हणजे वर्षातून केव्हाही लागवड करता येते लागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करावे लागवडी अगोदर वाफे चांगले भिजवून घ्यावेत लागवडीसाठी एक वर्षाच्या पिकाचे कंद घ्यावेत कंदावरील पाने कापून घ्यावीत पाच ते सहा सेंटीमीटर कंद जमिनीखाली दाबून लागवड करावी लागवडीसाठी दोन ओळीतील अंतर साधारणतः 30 सेंटीमीटर आणि दोन रोपांमध्ये 30
सेंटीमीटर अंतर ठेवावे लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे या पिकाला हंगामानुसार व जमिनीच्या प्रकारानुसार पाच ते दहा दिवसाच्या अंतराने भरपूर पाणी द्यावे लागवडीच्या वेळी हेक्टरी 200 ते 300 किलो सुपला पंधरा पंधरा पंधरा या खताची मात्रा द्यावी आणि या पिकावर रोग व केळीचा प्रादुर्भाव फार नसतो त्यामुळे हे पीक निंदणी करून तनविरहित ठेवलं पाहिजे काढणीच बघितले तर साधारणतः लावणी पासून एक लागवडीपासून एक वर्षानंतर पिकाचे शेंडे जेव्हा पिवळे पडतात त्यावेळी जमीन खोलवर खोदून कंदांची काढणी करावी कंद जमिनीत 30 ते 40 cm पर्यंत खोल पसरलेले असतात काढणी करताना शेंड्याचा भाग कापून पुढील लागवडीसाठी राखून ठेवतात कंद साधारणतः 30 ते 45 cm
लांब असतात कंदावरील सर्व तंतूंमुळे छाटून पाच ते आठ सेंटीमीटर लांबीचे तुकडे करून पाण्याने स्वच्छ धुवावे त्यानंतर ते उन्हात पाच ते सात दिवस साधारण आठवडाभर वाळवावे आणि हेक्टरी ओले वेखंडाचे उत्पादन जर पाहिलं तर ते साधारणतः पाच टनापर्यंत येतं आता याचे आपण वेखंडाचे उपयोग जर बघितले तर औषधांसाठी वेखंडाचा कंद वेखंडाचा कंद वापरतात वेखंड हे कप्प पित्त आणि वातनाशक म्हणून वापरतात सर्दी पडशे डोके डोकेदुखी असेल तर त्यासाठी वेखंडाचा लेप कपाळावर लावतात उलटी किंवा तसे सूज संधिवात आमवात मूळव्यात पक्षवात किंवा ताप या विकारांसाठी सुद्धा वेखंड उपयोगी पडते वेखंडाच्या वाळलेले जे कंद असतात त्यामध्ये साधारणतः दीड ते तीन टक्के पर्यंत
सुगंधित तेल सुद्धा निघतं एकरी साधारणतः एकोरीन ग्लुकोसाईड आणि युनिनॉल एसआर कॅफिन ही घटक द्रव्य याच्यामध्ये असतात आणि वेखंडाचा बाजार भाव जर बघितलं तर मंडळी साधारणतः 30 ते 40 रुपये प्रति किलो म्हणजे वेखंडाचे जे गड्डे असतात ते 30 ते 40 रुपये प्रति किलोने विक्री होते आणि त्याला चांगली मागणी आहे अलीकडे त्याची 50- 60 रुपया पेक्षा जास्त सुद्धा किंमत त्याला मिळते त्यामुळे शेतकरी बांधवांनी ज्यांच्याकडे पोयट्याची जमीन आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि अशी काळी जमीन असेल त्यांनी वेखंडाची लागवड करून चांगल्या प्रकारे प्रकारे उत्पन्न घेता येऊ शकतं त्यामुळे आज हा वेखंडाची शेती कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ होता मी मित्रांनो
तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद