केंद्र सरकारने लहानग्यांसाठी पेन्शनची योजना सुरू केली केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी एनपीएस वात्सल्य नावाची पेन्शन योजना सुरू केली आहे शून्य ते 18 वयोगटातील मुलांसाठी ही योजना असणार आहे नेमकी योजना काय आहे आणि कसा तुमच्या मुलांना या योजनेचा फायदा होणार आहे जाणून घेऊया तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन महिन्याला गुंतवा हजार मुलं होतील कोटी तुमच्या चिमुकल्यांचं भविष्य होणार सुरक्षित सध्या देशात पेन्शन वरून घमासान सुरू आहे मात्र अशातच तुमच्या मुलांसाठी केंद्राने पेन्शन योजना सुरू केली आहे एनपीएस वात्सल्य असं या योजनेचे नाव आहे योजनेअंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी तरतूद म्हणून निवृत्ती वेतन खातं उघडता येणार आहे योजनेमुळे पालकांना आपल्या मुलाचं
भविष्य सुरक्षित करण्यासाठी साठी गुंतवणूक करता येणार आहे पालक ऑनलाईन माध्यमातून तसेच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून एनपीएस वात्सल्य योजनेत खातं उघडू शकतात नेमकी काय आहे ही योजना पाहूया केंद्राची एनपीएस वात्सल्य योजना सुरू होणार शून्य ते 18 वयोगटासाठी बाल पेन्शन योजना आहे महिन्याला किमान 1000 तर कमाल अमर्यादित रक्कम जमा करता येणार आहे मुलांच्या 18 वर्षापर्यंत हे खातं पालक चालवतील 18 वर्षानंतर मुलांच्या नावे हे खातं होणार आहे एनपीएस वात्सल्य योजनेत कसा आणि किती परतावा मिळू शकतो समजून घेऊया समजा वयाच्या 19 ते 60 वर्षांपर्यंत मुलांनी त्यात दरमहा एक हजार रुपये गुंतवले अशाप्रकारे एकूण 60 वर्षांच्या कालावधीत एनपीएस
वात्सल्य योजनेत 7 लाख वीस हजार रुपयांची गुंतवणूक होईल यातून तुम्हाला जवळपास तीन कोटी 76 लाखांचं व्याज मिळणार आहे अशाप्रकारे तुमचा एकूण कॉर्पस तीन कोटी 83 लाख रुपये होईल समजा वयाच्या 60 व्या वर्षानंतर तुमच्या मुलांनी एनपीएस वात्सल्य खात्यातील सर्व पैसे ॲन्युटी प्लॅन मध्ये गुंतवून पेन्शन घेतलं असं समजू त्या प्लॅन मधील व्याजदर केवळ पाच ते सहा टक्के असतं तरी तुमच्या मुलांना वर्षाला फक्त 19 ते 22 लाखांचं व्याज मिळेल म्हणजेच दरमहा दीड ते दोन लाख रुपये पेन्शन म्हणून मिळेल या योजनेत आई-वडील मुलांच्या निवृत्ती निधीसाठी बचत करू शकतात त्यामुळे तुमच्या मुलाच्या भविष्याची चिंता दूर करण्यासाठी आजच या योजनेत पैसे
गुंतवू शकता मात्र योजनेचे सर्व दस्तऐवज वाचून आणि नियमटी समजूनच पैशांची गुंतवणूक करा आणि आपल्या पाल्याचं भविष्य सुरक्षित करा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही